Friday, October 26, 2012

हृदयाच्या खुणा ........!!

सरला दिवस आठवण सरेना
स्थिरता मन भान उरेना
क्षणभंगूर हे स्वप्न मनी वाटे
बावरे जीव अंधार दाटे
न कळे न वळे मनाचे कोडे
उगाच धावे दाही दिशा काळीज वेडे

रंगता रंग रंगे भ्रमता तन रमे
विक्षिप्त अस्पष्ट घटे मनी
चाहूल वाजे काहूर माजे क्षणोक्षणी
न कळे सांगू कुणा हसू फुले बोलू कुणा
स्वर ही आर्त होई व दीर्घ हृदयाच्या खुणा ........!!

...................................... दिनेश जगन्नाथ सुर्वे.

No comments:

Post a Comment