Friday, October 26, 2012

भावनांची लेखणी

आयुष्याच्या कागदावर
भावनांची लेखणी
गालावरती ओघळणारे
आसवांचे पाणी.

यातना दु:ख भारावून जाई
तुज आठवता मन खालावून जाई
खल मनाचा भंडावून जाई
आर्त सूर ही सूर शोधू पाही
जुळता सूर मन हे जुळेना
जुळता मन स्वर ही मिळेना
झुरते मन सहन न होई
जळतो एकांत मरण न येई ...!!!
.................... दिनेश जगन्नाथ सुर्वे.

No comments:

Post a Comment