Saturday, January 22, 2011

तुज संगे जगण्यासाठी आलो मी इथवरी........!

तुज संगे जगण्यासाठी आलो मी इथवरी........!
तुज संगे जगण्यासाठी आलो मी इथवरी........!
...... तूच माझ्या स्वप्नातील ग गोड परी.....!!
तुज संगे.................

आपल्या प्रेमाचा गातो मी वारसा............!
..... देतो तुला मी हा प्रेमाचा आरसा .....!!

ह्या आरश्यात आपुले प्रेम तू न्याहाळ ना .........!
...... ह्या प्रेमाची फूले पाहशील तू होताना .....!!
..... दर्प तो श्वसनी घेउन सुगन्धित होताना .....!
छबि दीसेल माझी तुलाच पाहताना .................!!!
तुज संगे...................

माझ्या प्रिये तू माझी रानी ग हृदयाची ..............!
..... गातो तुझ्यासाठी अन कविता ही तुज साठी ...!!
......तू माझी मी तुझा कल्पना ही शब्दांची.........!
सदा अंतरी तू माझ्या निर्मीती ही तुज साठी .........!!!
तुज संगे................

....................... दिनेश जगन्नाथ सुर्वे.

गुन्हा .......??

ठरवून टाकले आज पुन्हा,
न करेन मी कधीही गुन्हा !!

पण गुन्ह्याची परिभाषा काय ती?
न मिळे ज्याला योग्य न्याय ती??
न्याय न्याय करत गरीब बापडा रडतो ...
फूकाच्या अन्यायाला बळी बिचारा पडतो !!!

सरकारी योजना मुळी त्याच्या अंगी पडत नाही,
आणि सरकारचे ही त्याच्या वाचून काही अडत नाही !
दोन वेळच्या भाकरी साठी राब राब राबायचे,
आणि मरण आले की त्याच जमीनीत निपचित पडायचे !!!

जन्माला आलो हा गुन्हा म्हणुन समजायचे,
आणि जन्मठेप समजुन आयुष्य कंठायचे !
अरे हाढ !! असा गुन्हा मी करणार नाही,
या नीच भ्रष्टाचारी लोकांना मी मतदान करणार नाही !!!

मतदान माझा हक्क आहे आणि तो मी करणार,
ह्या नीच सत्ताधारी लोकांना जागा त्यांची दाखवणार !
जागे झाले राष्ट्र हे ... बोला जय महाराष्ट्र हे ...
वंदन करून मातृ-भूमी ला... चला जाऊ मतदानाला !!!

----- दिनेश जगन्नाथ सुर्वे

माझे काही स्वरचित लिखाण.........

हमको तो पीने कि आदत नही थी, और पीने कि हमको जरूरत भी नही थी !
पर जब से अपनाया नजरो ने आपको, नजरो से पीने कि आदत हो चुकी है !!
लगता है ऐसे अब जान लेगी ये आदत, आदत ये अभी बेशुमार हो रही है !
काश बचाले कोई इन कातिल नजरो से, नजरे ये अभी धारदार हो रही है...!!!
.................................. दिनेश जगन्नाथ सुर्वे.