ठरवून टाकले आज पुन्हा,
न करेन मी कधीही गुन्हा !!
पण गुन्ह्याची परिभाषा काय ती?
न मिळे ज्याला योग्य न्याय ती??
न्याय न्याय करत गरीब बापडा रडतो ...
फूकाच्या अन्यायाला बळी बिचारा पडतो !!!
सरकारी योजना मुळी त्याच्या अंगी पडत नाही,
आणि सरकारचे ही त्याच्या वाचून काही अडत नाही !
दोन वेळच्या भाकरी साठी राब राब राबायचे,
आणि मरण आले की त्याच जमीनीत निपचित पडायचे !!!
जन्माला आलो हा गुन्हा म्हणुन समजायचे,
आणि जन्मठेप समजुन आयुष्य कंठायचे !
अरे हाढ !! असा गुन्हा मी करणार नाही,
या नीच भ्रष्टाचारी लोकांना मी मतदान करणार नाही !!!
मतदान माझा हक्क आहे आणि तो मी करणार,
ह्या नीच सत्ताधारी लोकांना जागा त्यांची दाखवणार !
जागे झाले राष्ट्र हे ... बोला जय महाराष्ट्र हे ...
वंदन करून मातृ-भूमी ला... चला जाऊ मतदानाला !!!
----- दिनेश जगन्नाथ सुर्वे