दु:ख वेदना खेळत असती
मनामध्ये माझ्या
अंतःकरणाचा बनला आहे
बगीचाच माझ्या ......!
कोणे एके काळी छान स्वप्ने तीत होती
लाल-गुलाबी अन केशरी छटा तीच होती
त्या रंगाच्या उधळणीत मी एकला न होतो
रमता त्या दुनियेत कधीही थकलो ही नव्हतो.
सहवासाच्या मधुर क्षणांनी सजलेलो होतो
सखे आनंदी कार्य कराया धजलेलो होतो
तू असताना तू नसताना ध्यास एक होता
जरी असती जीव वेगळे श्वास एक होता
कुणी म्हणे बलवान मज पण त्राण न राहिला
तू दुरावल्या पासून सखये प्राण न राहिला
कुशीत तुझ्या निद्रेस शरीर हे अभिप्रेत आहे
पण तुझ्यावाचून सखये ते एक प्रेत आहे
स्वतःच माझी हत्या केली स्वतःस मी गाडले
मृत स्वप्नांची पिशाच्च आता भवती फिरू लागले......!!!
.................................................... दिनेश जगन्नाथ सुर्वे.
मनामध्ये माझ्या
अंतःकरणाचा बनला आहे
बगीचाच माझ्या ......!
कोणे एके काळी छान स्वप्ने तीत होती
लाल-गुलाबी अन केशरी छटा तीच होती
त्या रंगाच्या उधळणीत मी एकला न होतो
रमता त्या दुनियेत कधीही थकलो ही नव्हतो.
सहवासाच्या मधुर क्षणांनी सजलेलो होतो
सखे आनंदी कार्य कराया धजलेलो होतो
तू असताना तू नसताना ध्यास एक होता
जरी असती जीव वेगळे श्वास एक होता
कुणी म्हणे बलवान मज पण त्राण न राहिला
तू दुरावल्या पासून सखये प्राण न राहिला
कुशीत तुझ्या निद्रेस शरीर हे अभिप्रेत आहे
पण तुझ्यावाचून सखये ते एक प्रेत आहे
स्वतःच माझी हत्या केली स्वतःस मी गाडले
मृत स्वप्नांची पिशाच्च आता भवती फिरू लागले......!!!
.................................................... दिनेश जगन्नाथ सुर्वे.
No comments:
Post a Comment