Friday, October 26, 2012

दिलासा

लिहायला मात्र बसलोय खरा
पण शब्द मात्र सुचेना
काय लिहावे काय रचावे
तेच बापडे कळेना .....?

अथांग सागर दृष्टीस पडे
इवलाले पक्षी त्यावरी उडे
दूर एखादी नौका असे
गडद रंग भास्कराचा दिसे.

झाडे, पाने, फुले व पक्षी
निसर्गाची एक भव्य नक्षी
सूर्याची माया व चंद्राची छाया
एक सोनेरी उन दुसरी काळीभोर काया

अलगद मनीचे कोडे सुटले
बंध सरले पाश तुटले
जन्म मरणाचा भेद न राही
शांत मन जणू सौंदर्य पाही
मनात न आता काही उरे
एव्हढाच दिलासा त्यास ही पुरे ....!!!
...................... दिनेश जगन्नाथ सुर्वे.

No comments:

Post a Comment