Monday, July 22, 2013

सोयरा ........!!

काल येथे दुसराच होता कोणी
आज तिसराच उभा आहे 
रयतेच्या टाळू वरले लोणी
सध्या खूप स्वस्त आहे !!

नयन स्वरती आरशाला 
बोले आज मी मस्त आहे 
लावूनी नव मुखवटा 
परी आत हुंदका बंदिस्त आहे !!

शेतात रडे कोणी 
ये जोर लावूनी तू 
काळोख तो ढगांचा 
बरसण्यास भिस्त आहे !!

किती हीन तो पुढारी 
वचनांचे पाश देतो 
गुंगीत त्या क्षणांच्या 
अकस्मात ढास घेतो !!

दारात उंबराच्या सस्मित तो दिसावा 
व्याभिचाराने नटलेला पुतळा परि असावा 
रडतेय मायभू ही धाय मोकलोनी 
लुटण्यास तीस नवा हा सोयरा असावा ……….!!! 
……………...................… दिनेश जगन्नाथ सुर्वे. 

No comments:

Post a Comment