Friday, May 3, 2013

तेजाब आसवांचा

लोचनांत माझ्या विरघळतात स्वप्ने
तेजाब आसवांचा विरघळतात स्वप्ने !

अंबरात मेघ, वारा गेले लांब कोसळूनी
जा तुम्ही ही दूर आठवनिंनो नयन बरसतील आता
नको सावल्यांनो थांबवा ते घुटमळणे
आभासालाही दचकून स्वप्ने बिथरतात आता !!

खंजीर भावनांचे हृदयात आत वसले
गंभीर त्या वणांचे पडसाद ना उमटले
मी द्रोह करुनी याचा फार क्षीण जाहलो
मरता मरे मरेना स्वप्नांत भंग झालो !!!
……………………… दिनेश जगन्नाथ सुर्वे. 

No comments:

Post a Comment