Monday, December 3, 2012

कल्लोळ.......

ऐकून आजही का
निःशब्द गार होतो
वेदना करी उसासे
निष्काम त्रास होतो

हा भाव अंतरीचा
सांगू कसा कुणास
निष्प्रेम जीव आता
रोखून श्वास घेतो

स्पर्शुनी गेले ऊन
हळूवार शांत वेळी
बरसुनी गेले मेघ
निद्रिस्त सांजवेळी

अस्फुट मंद गीत
घुटमळे उगाच
निःश्वास शांत काया
कल्लोळ तो जिव्हाळी.....!!!

No comments:

Post a Comment